जनरल मोटर्सच्या कामगारांच्या प्रश्न विधानसभेत

 


जनरल मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तळेगाव दाभाडे जिल्हा पुणे येथील कंपनी 2020 पासून बंद आहे. त्यामुळे येथील कंपनीतील 1086 कायम कामगारांचा उदरनिव्हाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. जनरल मोटर या कंपनीने सुरुवातीच्या काळात ही कंपनी चीनच्या ग्रेट वॉल मोटरला विकण्याचा घाट घातलेला होता.पण भारत सरकारच्या एफडीआय धोरणामुळे ग्रेट वॉल कंपनी भारतात येण्याची जुलै 2022 ला रद्द झाले.

 त्यानंतर ही कंपनी जनरल मोटरने त्यांचा प्रकल्प हुंडाई मोटर या कंपनीला हस्तांतरित करण्याचे ठरवले आहे. तोही कामगारांशिवाय यानंतर येथील कामगारांनी 100 पेक्षा जास्त आमदार खासदार व विधान परिषद सदस्यांच्या सहयांची पत्र महाराष्ट्र सरकारला पाठवले आहे. परंतु त्याचा काही फरक कंपनीला पडलेला दिसत नाही. 25 जुलै रोजी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत औचित्य त्याच्या मुद्द्यावर बोलताना  हा प्रश्न मांडला व कामगारांच्या प्रश्नावर आक्रमक होत कामगारांना न्याय हक्काच्या बाजू उभे राहिले. आमदार शेळके म्हणाले येथील कायम कामगार 1086 व इतर अडीच हजार कामगार हे राज्यभरातून आले आहेत.

 त्यांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी त्या प्लांट वर नवीन येणाऱ्या कंपनीत सामावून घेतले जावे. यासाठी येथील कामगार राज्य सरकार व कामगार न्यायालय येथे लढा देत आहे. कामगारांना 110 दिवसाचे व्ही आर एस पॅकेज 27 जुलैपर्यंत घ्यावे असे कामगारावर दबाव टाकण्यात आला. आमदार शेळके म्हणाले की माझी मंत्री महोदयांना अशी विनंती आहे की प्रश्नावर उत्तर द्यावे. नवीन कंपनी परत कामावर घ्यावे अशा प्रकारचा निर्णय वेगाने घ्यावा निर्णय जर होणार नसेल तर एका आठवड्यानंतर सर्व कामगार आपल्या परिवारास रस्त्यावर उतरणार आहेत त्यांच्यासोबत आम्ही रस्त्यावर उतरू अशाप्रकारे आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

विशेष महागाई भत्ता परिपत्रक दि. 1 जानेवारी 2024 ते दि.30 जून 2024

   " किमान वेतन" या    संज्ञेत मूळ वेतन ,  अधिक कामगार विभागाने सदर रोजगाराकरिता वेळोवेळी विहित व प्रकाशित केलेले विशेष भत्ते यांच...

Blogger द्वारे प्रायोजित.