जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक व्हेईकल कंपनी टेस्ला अखेर जानेवारी 2024 भारतात येणार.

 

जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक व्हेईकल कंपनी टेस्ला अखेर जानेवारी 2024 भारतात येणार.

जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वेहिकल कंपनी अखेर भारतामध्ये येणार हे जवळपास निश्चित झालेला आहे. टेस्ला ही कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून भारतामध्ये प्रवेश करण्याचा किंवा भारतीय मार्केट कॅप्चर करण्याचा प्रयत्न करते. पण त्याच्यामध्ये काही अडथळे येत होते आणि लवकरच टेस्ला भारतामध्ये आणि तीही गुजरातमध्ये येण्याची शक्यता आहे. अर्थात या सगळ्या संदर्भातली अधिकृत घोषणा आता या क्षणाला झालेली नाहीये. पण 10 ते 12 जानेवारीच्या दरम्यान व्हायब्रंट गुजरात समेट होणार आहे. ज्याला स्वतः पंतप्रधान मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे आणि तिथेही महत्त्वपूर्ण घोषणा होणार अशी शक्यता आहे. काल गुजरातचे मंत्री आणि गुजरात सरकारचे प्रवक्ते ऋषिकेश पटेल यांनी या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचे विधान केले आणि टेस्लाची गुजरात मधली एन्ट्री ची जवळपास निश्चित झालेली आहे. अशा पद्धतीची एक चर्चा त्यांच्या या विधानानंतर सुरू झाली आहे नेमकं त्यांनी काय म्हटलं ते आपण बघूया ऋषिकेश पाटील म्हणतात टेसला गुजरात मध्ये येईल याबद्दल गुजरात सरकार खूप आशादायी आहे. एलोन मस्क हे गुजरातकडे पहिली पसंती म्हणून पाहत आहेत. भारतात प्लांट साठी सर्वेक्षण सुरू केलं तेव्हापासूनच त्यांच्या डोक्यामध्ये गुजरात आहे. कदाचित लवकरच त्याबाबतची अधिकृत घोषणाही होईल तसं झाल्यास आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करू टाटा,फोल्ड आणि सुझुकी प्रमाणेच आवश्यक ते सर्व सहकार्य याही कंपनीला करून आता गुजरातची ऑटो हब म्हणून गेल्या काही वर्षात ओळख बनत चालली आहे.

भारत हा चार चाकी गाड्यांसाठी जगात तिसऱ्या क्रमांकाचा मार्केट असलेला देश आहे. भारतात विदेशात बनलेल्या चार चाकी वर शंभर टक्के आयात कर आहे.  आयात करा मध्ये सवलत द्या अशी टेस्टला ची मागणी होती.तर दुसरीकडे केवळ बाहेरच्या गाड्या आणून येथे विकू नका इथेही उत्पादन करा अशी भारत सरकारची अट आहे. या दोन्हीमध्ये अद्याप सुवर्णमध्ये निघालेला नव्हता. पण आयात करा मध्ये पंधरा टक्के सवलग आणि त्या बदल्यात पुढच्या दोन वर्षांमध्ये इथे मॅन्युफॅक्चरिंग करावं असा काहीतरी तोडगा निघण्याची शक्यता आहे. दोन बिलियन डॉलर म्हणजे जवळपास 17 हजार कोटींची गुंतवणूक भारतात करण्याची टेस्लाची तयारी आहे.  आता या सगळ्या शक्यता आहेत अजूनही अधिकृत घोषणा जी आहे ती झालेली नाहीये कारण याच्या आधी सुद्धा खूप चर्चा होती टेसला येणार पण त्या आयात करायच्याच मुद्द्यावरून सगळं आहे ते आणलेलं होतं.

टेस्ला जगामध्ये अमेरिकेच्या बाहेर केवळ जर्मनी आणि चीनमध्ये आपलं उत्पादन करतात. त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी कुठे मॅन्युफॅक्चर युनिट स्थापन केलेले नाहीये.आणि भारतामध्ये सुद्धा ते तिथे तयार झालेल्या गाड्या आणि विशेषतः चीन मधून तयार झालेल्या गाड्या इथे विकणार का हा एक मुद्दा होता वादाचा भारत सरकारने त्याला विरोध केला होता.  भारताचे म्हणणं होतं की केवळ तिथल्या गाड्या तयार करून आमच्याकडे विकू नका प्रोडक्शन जे आहे ते झालं पाहिजे आणि त्यामुळे त्याच्या बदल्यात त्यांना किती आयात करा मध्ये सवलत मिळते त्याच्यावरती हे सगळं गणित जे आहे ते अवलंबून असेल पण ज्या सगळ्या घडामोडी मध्ये म्हणजे मुळात टेस्ला इतकी मोठी कंपनी आहे तिचं येणं भारतामध्ये किती महत्त्वाचा आहे हे सुद्धा लक्षात घ्या.


टेस्ला ही जगातली सगळ्यात मोठी वेहिकल इलेक्ट्रिक वेहिकल कंपनी आहे. एक ट्रिलियन डॉलर इतकामार्केट व्हॅल्यू या कंपनीच्या आहे. आणि त्यांच्या नजीकच्या पाच स्पर्धकांची मिळून जेवढी किंमत होते.  मार्केट व्हॅल्युएशन त्याच्यापेक्षा अधिक टेस्लाच व्हॅल्युएशन आहे. जगभरामध्ये टेस्लाचे केवळ सहा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत त्यापैकी चार अमेरिकेत आहेत. अमेरिकेच्या बाहेर जर्मनी आणि चीन या दोनच देशांमध्येला टेस्ला उत्पादन करतो. 

आता भारतामध्ये इलेक्ट्रिक गाड्यांच्या वापराबाबत मोदी सरकार प्रोत्साहन देत आहे. 2030 पर्यंत 40 ते 45 टक्के गाड्या इलेक्ट्रिक असतील असा एक अंदाज आहे. सध्या भारतातलं इलेक्ट्रिक व्हेईकलचे मार्केट आहे ते बहुतांश करून टाटा मोटर्स व्यापलेला आहे.  आणि त्या पार्श्वभूमी वरती टेस्लाच भारतात येणं ही भविष्याच्या दृष्टीने आणि भारताच्या एकूण ऑटो मार्केटच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाची घडामोडी असणार आहे. या टेसलाच्या भारतातल्या एन्ट्री साठी तीन पर्याय होते अशा बातम्या पण आलेल्या आहेत एक तर महाराष्ट्र तामिळनाडू आणि गुजरात या तीन राज्यांचा विचार जो आहे तो त्यांची कंपनी जी आहे ती भारतामध्ये करत होती.  पण व्हायब्रंट गुजरात समेट मध्ये ही घोषणा झाली तर हे याच्या वरती गुजरात न बाजी आहे ती मारलेली आहे. आणि गेल्या दशक भरामध्ये विशेषतः 2010 नंतर ज्या पद्धतीने गुजरातमध्ये घेतलेली आहे ती खूप महत्त्वाची आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

विशेष महागाई भत्ता परिपत्रक दि. 1 जानेवारी 2024 ते दि.30 जून 2024

   " किमान वेतन" या    संज्ञेत मूळ वेतन ,  अधिक कामगार विभागाने सदर रोजगाराकरिता वेळोवेळी विहित व प्रकाशित केलेले विशेष भत्ते यांच...

Blogger द्वारे प्रायोजित.