ईएसआयसी ESIC योजना व लाभ(ESIC Scheme and Benefits)

 

ईएसआयसी ESIC योजना व लाभ(ESIC Scheme and      Benefitsराज्य कामगार विमा योजना ESIC employment State insurance corporation ही योजना कामगारांच्या आजारपणासाठी मातृत्व रजेसाठी किंवा तात्पुरती किंवा तात्पुरती व कायम अपंगत्व होणाऱ्या मृत्यू किंवा त्यामुळे कमवण्याची क्षमतेमध्ये होणारी घट यासारख्या  करण्यासाठी हिताचे रक्षण करण्यासाठी व सामाजिक सुरक्षा देणारी योजना आहे. तसेच कामगाराला वैद्यकीय सेवा व त्याच्या कुटुंबाला वैद्यकीय सेवा देणे दृष्टीने योजना अत्यंत महत्त्वाची योजना आहे. योजना अधिनियम 1948 मुळे केंद्र सरकारनी ही योजना 24 फेब्रुवारी 1952 मध्ये प्रथम अंमलबजावणी केली. ही योजना सर्वप्रथम दिल्ली व कानपूर येथे लागू करण्यात आली. या योजनेमध्ये मातृत्वाचा लाभ 1961 रोजी देण्यात आला.

नोंदणी म्हणजे काय ?

नोंदणी प्रक्रिया म्हणजे प्रत्येक नियोक्ता / कारखान्यास व वेतनावर ठेवलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यास ह्या योजने अंतर्गत ओळख दिली जाते व त्यांच्यासाठी त्यांचे वैयक्तिक अभिलेख तयार केले जातात.

 आजारपणाचे लाभ :

विमित कामगारांना प्रमाणित आजारपणात वर्षामध्ये जास्तीतजास्त 90  दिवसांपर्यंत वेतनाच्या 70 % दराने रोख स्वरुपात नुकसानभरपाई मिळू शकते. आजारपणाचे लाभ मिळण्यास पात्र होण्यासाठी ६ महिन्यांच्या अंशदान कालावधीमध्ये विमित कामगाराने78 दिवसांचे अंशदान दिलेले असले पाहिजे.

लाभ व अन्शादानाच्या शर्ती :

राज्य कामगार विमा योजनेचे वैशिष्ट्या म्हणजे त्यातील अंशदान हे देण्याच्या क्षमतेवर अवलंबून कामगारांना देय असणाऱ्या वेतनाची ठराविक टक्केवारीच्या स्वरुपात असते तर मिळणारा सामाजिक सुरक्षिततेचा लाभ हा प्रत्येकाच्या गरजेनुसार कोणताही भेदभाव न करता दिला जातो. महामंडळातर्फे रोख लाभ त्यांच्या शाखा कार्यालयातून / अधिदान कार्यालयातून अंश्दानाच्या शर्तींच्या अधीन राहून केले जाते.

1 वैद्यकीय देखभाल वैयक्तिक खर्चावर कोणतीही कमाल मर्यादा नसलेली प्राथमिक, दुय्यम,

तिय्यम वैद्यकीय देखभाल

2 आजारपणाचा लाभ 90 दिवस

3 विस्तारीत आजारपणाचा लाभ 34  विशिष्ट आजारांसाठी 730 दिवस ( दोन वर्षेपर्यंत )

4 मातृत्वाचा लाभ 84  दिवस + 9  महिना (प्रसूति, गरोदरपण, मुदतीपूर्वी बाळाचा जन्म झाल्यास इत्यादी

5 तात्पुरता अपंगत्व लाभ / कायमचे अपंगत्व लाभ कमविण्याच्या क्षमतेत नुकसान झाल्याच्या   प्रमाणात / अपंगत्व अस्तित्वात असेपर्यंत

7  अवलंबिताचे लाभ विमित व्यक्तीचे निधन झाल्यास त्याच्या पत्नीला ती हयात असेपर्यंत / पुनर्विवाहित होईपर्यंत व कुटुंबियांना विवाह / वया संबंधी असलेल्या शर्तीनुसार

7  राजीव गांधी श्रमिक कल्याण योजना कारखाना / आस्थापना बंद झाल्यावर किंवा कपातीमुळे किंवा सेवेतील इजेमुळे 40% पेक्षा कमी नसलेल्या कायमस्वरूपी अपंगत्वामुळे तो बेरोजगार झाल्यास एक वर्षा पर्यंत दैनंदिन सरासरी वेतनाच्या50% पर्यंत

8  अपंग व्यक्तींना नियमित सेवेत घेणाऱ्या खासगी क्षेत्रातील नियोक्त्यांना प्रोत्साहन रु21000/- पर्यंत मासिक वेतन घेणाऱ्या अपंग व्यक्तींच्या नियोक्त्यांच्या अंशदान पहिल्या तीन वर्षांसाठी केंद्र सरकार तर्फे देण्यात येईल

9  निवृत्त विमित व्यक्तींना वैद्यकीय देखभाल वार्षिक रु 120/- भरून राज्य कामगार विमा योजने अंतर्गत उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधा.

विस्तारीत आजारपणाचा लाभ :

34  प्रकारच्या गंभीर व दीर्घ मुदतीच्या आजारांमध्ये वेतनाच्या 80% दराने आजारपणाचा लाभ दोन वर्षेपर्यंत वाढविला जाऊ शकतो.

वाढीव आजारपणाचा लाभ :

नसबंदीची शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या विमित पुरुष व महिला कामगारांना त्यांच्या वेतनाएवढा आजारपणाचा लाभ अनुक्रमे 7 व 14  दिवसांसाठी मिळू शकतो.

 मातृत्वाचा लाभ :

मागील वर्षात70 दिवसांचे अंशदान केल्याच्या अधीन राहून पूर्ण वेतनाएवढ्या रकमेचा मातृत्व लाभ तीन महिन्यांसाठी पात्र असतो व वैद्यकीय सल्ल्यानुसार तो एक महिना वाढविता येऊ शकतो.

तात्पुरत्या अपंगत्वाचे लाभ :

सेवेतील इजा असल्यास अंशदान अदा केले असेल अगर नसेल, तरीसुद्धा विमित सेवेत प्रवेश केल्यापासून तात्पुरत्या अपंगत्वाचे लाभ मिळतील. अपंगत्व कायम असेपर्यंत वेतनाच्या ९०% रक्कम तात्पुरते अपंगत्व लाभ म्हणून देय असेल.

कायम अपंगत्वाचे लाभ :

वैद्यकीय मंडळाने प्रमाणित केलेल्या कमविण्याच्या क्षमतेतील घटीनुसार वेतनाच्या 90% रक्कम लाभाच्या स्वरुपात दर महा दिली जाते.

अवलंबीतांचे लाभ :

विमित व्यक्तीचे सेवेतील इजेमुळे किंवा नोकरीतील जोखिमीमुळे निधन झाले असल्यास मृत व्यक्तीवार अवलंबून असलेल्या अवलंबिताना वेतनाच्या 90 % दराने अवलंबिताचे लाभ दिले जातात.

इतर लाभ :

अंत्येष्टीचा खर्च : मृत विमित व्यक्तीवरील अवलंबित किंवा त्याची अंत्येष्टी विधी करणाऱ्याला रु 10000 /- पर्यन्त रक्कम दिली जाते.

 प्रसुती खर्च : राज्य कामगार विमा योजनेखाली वैद्यकीय सेवा उपलब्ध नसतील अशा ठिकाणी विमित स्त्री किंवा विमित व्यक्तीची पत्नीची प्रसूति झाल्यास प्रसुती खर्च देण्यात येतो.  त्या व्यतिरिक्त विमित कामगारांना गरजेनुसार अन्य लाभ दिले जातात.

 व्यावसायिक पुनर्वसन :

कायम स्वरूपाचे अपंगत्व आलेल्या व्यक्तींना व्यावसायिक पुनर्वसन प्रशिक्षण केंद्रामध्ये व्यावसायिक पुनर्वसन प्रशिक्षण घेण्यासाठी

शारीरिक पुनर्वसन :

सेवेतील इजेमुळे शारीरिक अपंगत्व आल्यास

वृद्धापकाळ वैद्यकीय देखभाल :

सेवानिवृत्ती किंवा ऐच्छिक सेवानिवृत्ती योजने अंतर्गत व कायम स्वरूपाच्या अपंगत्वामुळे सेवा त्याग करावा लागलेल्या विमित व्यक्तींसाठी व त्यांच्या पत्नीसाठी वार्षिक रु 120- भरून वैद्यकीय देखभाल उपलब्ध आहे.

राजीव गांधी श्रमिक कल्याण योजना :

बेरोजगार भत्त्याची ही योजना 2005 पासून लागू करण्यात आली आहे. विमित झाल्यावर तीन किंवा जास्त वर्षांनी कारखाना / आस्थापना बंद झाल्यावर किंवा कपातीमुळे किंवा कायमस्वरूपी अपंगत्वामुळे तो बेरोजगार झाल्यास :-

जास्तीत जास्त एक वर्ष कालावधी पर्यंत वेतनाच्या 50% रक्कम बेरोजगार भत्ता देण्यात येईल.

विमित व्यक्तीला बेरोजगार भत्ता प्राप्त होत असेपर्यंत, त्याला व त्याच्या कुटुंबाला राज्य कामगार विमा योजना रुगानालये / दवाखान्यातून वैद्यकीय देखभाल मिळेल.

आपली कौशल्ये अद्ययावत करण्यासाटी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क / प्रवास भत्ता यावरील खर्च राज्य कामगार विमा महामंडळ सोसेल.

अपंग व्यक्तींना नियमित सेवेत घेणाऱ्या खासगी क्षेत्रातील नियोक्त्यांना प्रोत्साहन :

जास्तीत जास्त एक वर्ष कालावधी पर्यंत वेतनाच्या 50 % रक्कम बेरोजगार भत्ता देण्यात येईल.

विमित व्यक्तीला बेरोजगार भत्ता प्राप्त होत असेपर्यंत, त्याला व त्याच्या कुटुंबाला राज्य कामगार विमा योजना रुगानालये / दवाखान्यातून वैद्यकीय देखभाल मिळेल.

आपली कौशल्ये अद्ययावत करण्यासाटी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क / प्रवास भत्ता यावरील खर्च राज्य कामगार विमा महामंडळ सोसेल.

राज्य कामगार विमा योजनेचे लाभ घेण्यास पात्र होण्यासाठी वेतनाची कमीतकमी मर्यादा रु 21000/- आहे.

केंद्र सरकारतर्फे नियोक्त्याचे अंशदान 3 वर्षांसाठी दिले जाईल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट देऊ शकता.

www.esic.gov.in

 कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

विशेष महागाई भत्ता परिपत्रक दि. 1 जानेवारी 2024 ते दि.30 जून 2024

   " किमान वेतन" या    संज्ञेत मूळ वेतन ,  अधिक कामगार विभागाने सदर रोजगाराकरिता वेळोवेळी विहित व प्रकाशित केलेले विशेष भत्ते यांच...

Blogger द्वारे प्रायोजित.