हरियाना सरकारप्रमाणे महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांना कंत्राटदार विरहित रोजगार: उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली Good News!

हरियाना सरकारप्रमाणे महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांना कंत्राटदार विरहित रोजगार: उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली Good News!


महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांना कंत्राटदार विरहित रोजगार देण्यासाठी हरियाणा सरकार प्रमाणे
जसे हरियाना कौशल्य विकास बोर्डाप्रमाणे नवीन यंत्रणा उभारणार असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी भारतीय मजदूर संघाच्या बैठकीत सांगितले. अशी माहिती जिल्हा अध्यक्ष आनंद लाड यांनी दिली.

सहयाद्री अतिथीगृह मुंबई येथे भारतीय मजदूर संघाशी संलग्न विविध संघटना प्रमुख यांची राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा व गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक सोमवारी (ता. ८)आयोजित केली होती. या मिटिंग मध्ये राज्याचे कामगारमंत्री सुरेश खाडे, फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्रीकर परदेशी, प्रधान सचिव (कामगार) विनिता सिंघल, प्रधान सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, तिन्ही कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक, संचालक (मा. सं) व मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी उपस्थित होते. भारतीय मजदूर संघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष अॅड. अनिल ढुमणे, महामंत्री मोहन येनुरे, प्रदेश सचिव अॅड. विशाल मोहिते, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ अध्यक्ष नीलेश खरात, महामंत्री सचिन मेंगाळे व रोहित कोळवणकर उपस्थित होते.



उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेमुळे कंत्राटी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कंत्राटी कामगारांना पारेषण व वितरण भरतीमध्ये आरक्षण व वयात सवलत मिळावी, आयटीआय नसलेले कुशल व अनुभवी कमी केलेल्या कामगारांना परत कामावर घ्यावे, कोर्ट केसेसच्या कामगारांना परत कामावर घेण्याच्या सूचना फडणवीस यांनी यावेळी आभा शुक्ला यांना दिल्या. राज्यातील कंत्राटदारांकडून होणाऱ्या त्रासाची माहिती दिली असता प्रधान सचिव यांनी वीज कंत्राटी कामगार संघाच्या सर्व समस्यांसाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेण्याची सूचना दिली. लवकरच यावर काम केले जाईल असे ही आश्वासन दिले. तसेच पगार वाढीचे पत्रक त्यांना दिले असता पगारवाढ दिली जाईल असेही ऊर्जामंत्री यांनी मान्य  केले.

अपघातात मृत्यु मुखी पडलेल्या कामगारांना आर्थिक मदत दिली जाईल,मेडिक्लेम योजना दिली जाईल व त्यांचे वेतन थेट बँकेत जाण्यासाठी प्रभावी यंत्रणा तातडीने राबवण्याच्या सूचना कामगार सचिव विनिता वेद सिंघल त्यांनी दिल्या. राज्यातील कंत्राटदारांच्या कडून होणाऱ्या त्रासाची माहिती दिली असता प्रधान सचिव ऊर्जा यांनी वीज कंत्राटी कामगार संघाच्या सर्व समस्यां साठी प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलवून मिटिंग घेण्याची सूचना देऊन कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना दिल्या.

कंत्राटदार विरहित व वयाच्या ६० वर्षांपर्यंत रोजगार मिळावा, यासाठी उर्जामंत्र्यांनी स्वतंत्र बैठक कंत्राटी कामगारांसोबत घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. तिन्ही कंपन्यांतील सर्व कंत्राटी कामगार संघटनांना एकत्र घेऊन कृती समितीच्या माध्यमातून आगामी लढा देणार असल्याचे अध्यक्ष खरात यांनी सांगितले. सचिन मेंगाळे यांनी ऊर्जामंत्री फडणवीस यांचे आभार मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

विशेष महागाई भत्ता परिपत्रक दि. 1 जानेवारी 2024 ते दि.30 जून 2024

   " किमान वेतन" या    संज्ञेत मूळ वेतन ,  अधिक कामगार विभागाने सदर रोजगाराकरिता वेळोवेळी विहित व प्रकाशित केलेले विशेष भत्ते यांच...

Blogger द्वारे प्रायोजित.